Advertisement

आबब ! बिग बॉसच्या एका भागासाठी सलमान एवढं घेतो मानधन


आबब ! बिग बॉसच्या एका भागासाठी सलमान एवढं घेतो मानधन
SHARES

'कलर्स' या वाहिनीवर प्रसारित होणारा शो 'बिग बॉस'ची सध्या जोरदार चर्चा आहे. यंदाच्या पर्वात कोणत्या सेलिब्रिटींची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता सर्वांनाच आहे. यात अनेकांच्या नावांची चर्चा आहे. त्यात आणखी एका चर्चेची भर पडली आहे, ती म्हणजे सलमान खानच्या मानधनाची!

बिग बॉसच्या सर्व पर्वांचे सूत्रसंचालन सलमान खाननेच केले आहे. बिग बॉसच्या ११ पर्वांचे सूत्रसंचालन करण्यासाठी प्रत्येक भागाचे सलमानला ११ कोटी रुपये मिळणार अशी चर्चा आहे. पण सलमानला याविषयी विचारण्यात आले, तेव्हा त्याने हसण्यावर नेले. नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सलमानला याविषयी प्रश्न विचारण्यात आला. पण पत्रकारांच्या प्रश्नावर सलमानला हसू आवरता आले नाही. हसत हसतच त्याने हातातील माईक वायकॉम १८चे राज नायक यांच्याकडे दिला. विनोदी अंदाजात तो राज यांना '११ करोड दे दो ना सर' असे म्हणत चेतवत होता.

'कलर्स' वाहिनीवर १ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता या शोचा प्रिमीयर होणार आहे. नव्या पर्वात बिग बॉसच्या घरात सर्वसामान्य आणि सेलिब्रिटी अशी धमाल पाहायला मिळणार आहे. शोसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. चर्चेत असलेल्या नावांमध्ये अभिनेत्री निया शर्मा, रिया सेन, सना सईद, ढिंच्यॅक पूजा यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

सलमान खानला एड्स?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा