बिग बॉस में शादी !

 Pali Hill
बिग बॉस में शादी !
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - भोजपुरी अभिनेत्री आणि बिग बॉस 10 ची प्रतिस्पर्धी मोनालिसा ही सध्या बिग बॉसच्याच घरात तिचा प्रियकर विक्रांत सिंह राजपूत याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. असं म्हटलं जात होतं की मोना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर विक्रांत तिच्याशी लग्न करणार होता. मात्र जेव्हा त्यांना बिग बॉसच्या घरात नॅशनल टीव्हीवर लग्न करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने लगेच होकार दिला.

या शोमध्ये मोना आणि तिच्यासोबत असलेल्या दुसरा प्रतिस्पर्धी मनू पंजाबी यांच्या जवळीकतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण या सर्व प्रश्नांना विक्रांतने शांतपणे उत्तर दिलं. विक्रांतने सांगितलं की मोना आणि मी हे नाते एक पाऊल पुढे घेऊन जाऊ इच्छित होतो. जेव्हा एका टास्कदरम्यान बिग बॉसच्या घरात जाऊन मोनाशी भेटलो तेव्हा अनुभूती झाली की, आपण मोनाला किती मिस केले. आपलं प्रेम जाणवून देण्याची यापेक्षा चांगली संधी मिळाली नसती, असं विक्रांत म्हणाला.

यापूर्वी अभिनेत्री सारा खान आणि अली मर्चेंट यांनीही बिग बॉसच्या घरात लग्न केलं होतं. मात्र त्यांचं नातं जास्त काळ टिकलं नाही.

Loading Comments