Advertisement

बिग बॉसमध्ये ‘बॉक्स-अनबॉक्स’चं कार्य


बिग बॉसमध्ये ‘बॉक्स-अनबॉक्स’चं कार्य
SHARES

कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या बिग बॉसमध्ये सदस्यांना येऊन आता जवळजवळ ९० दिवस पूर्ण होतील. या प्रवासामध्ये स्पर्धकांमध्ये स्पर्धा, मैत्री, प्रेम, धोका अशा अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत. प्रत्येकाने स्वत:भोवती समज-गैरसमजांची चौकट आखून घेतली आहे. नेमकी हीच चौकट मोडून काढत स्वत:वर विजय मिळविण्यासाठी बिग बॉस गुरूवारी सदस्यांवर बॉक्स-अनबॉक्स हे कार्य सोपवणार आहेत.


टिकीट टू फिनाले

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना रोज वेगवेगळ्या प्रकारचं कार्य दिलं जातं. बुधवारीदेखील बिग बॉस यांनी सदस्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं हटके कार्य सोपावलं आणि रिटर्न गिफ्ट म्हणून सदस्यांना ‘टिकीट टू फिनाले’ मिळणार असं घोषित केलं. आता या रेसमध्ये कोणाला ‘टिकीट टू फिनाले’ मिळणार हे बघणं रंजक असणार आहे.


थेट महाअंतिम फेरीत

ज्याला ‘टिकीट टू फिनाले’ मिळणार तो थेट महाअंतिम फेरीमध्ये पोहचणार आहे. तसंच याच टास्कमध्ये अजून एक कार्य देण्यात आलं आहे. ते म्हणजे सदस्यांना एकमेकांचं प्रतिनिधित्व करायचं होतं. सदस्यांना बाबागाडी देण्यात आली आणि ज्या सदस्याची बाबागाडी पार्क होऊ शकणार नाही तो ‘टिकीट टू फिनाले’ या रेसमधून आउट होणार.


आस्ताद, रेशम बाद

बुधवारी आस्तादची बाबागाडी पुष्कर पार्क करण्यात असफल ठरल्यामुळे आस्ताद या रेसमधून बाद झाला. तसंच बिग बॉस यांनी सदस्यांना अजून एक टास्क दिला अाहे. यामध्ये सदस्यांना ज्यांना नॉमिनेट करायचं आहे त्यांच्या चेहऱ्यावर फोम लावायचं असं सांगितलं. या टास्कमध्ये सई, मेघा, शर्मिष्ठा आणि पुष्करनं रेशमला नॉमिनेट करून ‘टिकीट टू फिनाले’ या रेस मधून बाद केलं. अशाप्रकारे आस्ताद आणि रेशम या टास्कमधून बाद झाले.


एकमेकांबद्दलचं संभाषण दाखवणार

बिग बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेच्या या टप्प्यावर घरातील इतर सदस्य आपल्याविषयी मागं काय बोलतात याची झलक घरातल्या प्रत्येक सदस्याला बघण्याची संधी बिग बॉस गुरूवारी देणार आहेत. ज्यामध्ये स्मिताला रेशम आणि आस्तादमधील संभाषण दाखविण्यात येणार आहे. पुष्कर, सई आणि रेशमला मेघा त्यांच्यामागे काय बोलली हे दाखविण्यात येणार आहे.


सदस्यांमध्ये होणार वाद 

हे संभाषण बघितल्यानंतर सदस्यांमध्ये वाद होणार हे नक्की. रेशम मेघाला हे सांगण्याचा प्रयत्न करेल कि, ती जे काही पर्सनल तिच्याबद्दल बोलली ते बोलायला नको होतं. तसंच सई शर्मिष्ठाला आणि आस्ताद मेघाला जाब विचारेल. यानंतर घरामध्ये काय घडामोडी होतील ते लवकरच समजेल.



हेही वाचा - 

‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’मधील वाद टळला

‘दिनकर संभाजी चव्हाण’ म्हणतो, “आता बस्स”




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा