Advertisement

‘बिग बॉस’ गाजवणारी सुशांत-आस्तादची जोडी पुन्हा एकत्र


‘बिग बॉस’ गाजवणारी सुशांत-आस्तादची जोडी पुन्हा एकत्र
SHARES

अभिनेता सुशांत शेलार आणि आस्ताद काळे यांची घनिष्ठ मैत्री ‘बिग बॉस’ कार्यक्रमात सर्वांनीच पाहिली आहे. आपल्या बेधडक व स्पष्टवक्तेपणामुळं ‘बिग बॉस’ गाजवल्यानंतर हे दोघे पुन्हा एकत्र येत आपला नवा अंदाज प्रेक्षकांना दाखवायला सज्ज झाले आहेत. रंगनील निर्मित ‘MR & MRS लांडगे’ या आगामी नाटकासाठी ही जोडी एकत्र आली आहे. शनिवारी १३ ऑक्टोबरला या नाटकाचा शुभारंभ होणार आहे.


नाटकाच्या निमित्ताने एकत्र

आपल्या या नव्या नाट्यकृतीबद्दल बोलताना हे दोघं म्हणाले की, ‘MR & MRS लांडगे’ या नाटकाच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. हे नाटक जसं आमच्यासाठी एक वेगळा अनुभव देणारं ठरलं तसंच ते रसिकांसाठीही ठरेल. वयाचं भान विसरायला लावणारी ही बेभान कॉमेडी निखळ आनंदासोबतच आमच्या भन्नाट ट्युनिंगची ट्रीट ही प्रेक्षकांना देईल असा विश्वास सुशांत आणि आस्ताद यांनी व्यक्त केला आहे.

सुशांत आणि आस्तादसोबत या नाटकात राजेश भोसले, परी तेलंग, मधुरा देशपांडे, रमा रानडे, अमर कुलकर्णी, अलका परब या कलाकारांच्याही भूमिका आहेत. कल्पना विलास कोठारी या नाटकाच्या निर्मात्या आहेत. सुरेश जयराम यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे, तर दिग्दर्शन विजय केंकरे यांचं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा