Advertisement

बिग बॉसच्या घरातून 'हा' सदस्य आऊट


बिग बॉसच्या घरातून 'हा' सदस्य आऊट
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच बिग बॉसच्या घरातील सदस्यांमधील काही नावे बरीच चर्चेत आहेत. त्यातलचं एक नावं म्हणजे विनीत भोंडे. विनीत भोंडे त्याच्या प्रत्येक वेळेला बिग बॉसकडे जाऊन छोट्या - छोट्या गोष्टींची मागणी करणे, कॅप्टन असताना सारखी टीम मीटिंग आयोजित करणे, मुद्दा सांगण्यात स्पष्टता नसणे, कॅप्टन असताना वा नसताना माईक विसरणे, घरामध्ये झोपणे जे बिग बॉसच्या घरात अमान्य आहे यामुळे चर्चेत राहिला.


विनीतला घराबाहेर पडण्याआधी बिग बॉसने माईक विसरण्याच्या सवईमुळे एक शिक्षा देखील दिली. पण, हे सगळं होत असतानाही घरातील काही सदस्यांना विनीत आवडायचा. त्याची लोकप्रियता अल्पावधीतच वाढली होती, तो प्रेक्षकांबरोबर घरच्यांचे देखील मनोरंजन करत होता. परंतु, या आठवड्यामध्ये त्याला पुरेशी मतं न मिळाल्यामुळे त्याला घराबाहेर जावे लागले.

घराला घरपण हे घरातील सदस्यांमुळेच असतं. आता बिग बॉसच्या घरातून एक एककरून सदस्य बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे वाईट तर वाटणारच पण हा खेळ असाच सुरू राहणार आहे. कार्यक्रमाच्या फॉर्मेटनुसार कोणी एक सदस्य दर आठवड्याला घरामधून बाहेर जाणार, हे निश्चित. आणि याबद्दलची कल्पना प्रत्येक सदस्याला आहे. म्हणूनच या प्रक्रियेतून आपल्या आवडत्या स्पर्धकाला वाचवण्यासाठी प्रेक्षकांनी भरपूर मत दिली. पण ज्या सदस्याला कमी मत मिळाली. त्याला या घरामधून बाहेर पडणे अनिवार्य होते. त्यामुळेच विनीतला घराबाहेर जावं लागलं. विनीतच्या घराबाहेर जाण्याने सगळ्यांनाच खूपच दु:ख झालं.

विनीत एलिमिनेट झाल्यानंतर त्याला एक विशेष अधिकार मिळाला, ज्यानुसार तो कोणत्याही एका स्पर्धकाला पुढच्या आठवड्याच्या घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करू शकतो आणि विनीतने अनिल थत्ते यांना नॉमिनेट केलं आहे. आता येत्या आठवड्यामध्ये अनिल थत्तेंबरोबर कोण नॉमिनेट होईल? प्रेक्षकांचं मत कोणाला वाचवेल? आणि कोण घराबाहेर जाईल? हे बघणं रंजक असणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा