सुश्मिताचं घर की डेंग्युचा अड्डा ?

  Khar
  सुश्मिताचं घर की डेंग्युचा अड्डा ?
  मुंबई  -  

  खार - अभिनेत्री सुश्मिता सेनला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली आहे. सुश्मिता खारच्या आंबेडकर रोडवरील सुद्गुरू सुंदरी को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये सहाव्या मजल्यावर राहते. पालिकेतर्फे या इमारतीमध्ये डेंग्युच्या डासांबाबत तपासणी करण्यात येत होती. मात्र तब्बल आठ दिवस सुश्मिता सेनने विविध कारणे पुढे करत आपल्या घरात डास शोधकांना प्रवेश नाकारला होता. गेल्या शुक्रवारी अखेर डास शोधकांनी तिच्या घराची पाहणी केली असता त्यांना पाहणीदरम्यान तीन ठिकाणी डासांची पैदास झाल्याचं दिसून आलं. ही ठिकाणं पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ नष्ट केली आणि सुश्मिता सेनला कलम ३८१ ब अन्वये नोटीस बजावली. त्मुळे लवकरच तिच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.