Advertisement

रजनीकांत आणि अक्षयच्या 2.0 चित्रपटाचं ग्रँड म्युझिक लाँच


रजनीकांत आणि अक्षयच्या 2.0 चित्रपटाचं ग्रँड म्युझिक लाँच
SHARES

सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 2.0 चित्रपटाचा ग्रँड म्युझिक लाँच सोहळा दुबईत पार पडला. जगातील सर्वाधिक उंच इमारत असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा इथे हा लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला रजनीकांत, अक्षय कुमार, ए आर रेहमानसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.



बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता करण जोहर आणि अभिनेता राणा डग्गुबती यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्काय डायविंगद्वारे 2.0 चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. या आलिशान सोहळ्यासाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.



अक्षय कुमारच्या डान्सनं या सोहळ्याची सुरुवात झाली. अक्षय कुमारसोबत सुपरस्टार रजनीकांत आणि अॅमी जॅक्सनने सुद्धा डान्स केला.




400 कोटी रुपयांचे बजेट असलेला 2.0 हा सर्वात महागडा चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. हा संपूर्ण चित्रपट थ्री-डी स्वरूपात चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटात रजनिकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.



हेही वाचा

जॉनी लीवर आणि असरानी यांचा कॉमेडी तडका!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा