जॉनी लीवर आणि असरानी यांचा कॉमेडी तडका!


जॉनी लीवर आणि असरानी यांचा कॉमेडी तडका!
SHARES

बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन जॉनी लीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या वेळी कुठल्या चित्रपटाच्या माध्यमातून नाही, तर जॉनी लीवर लवकरच एक कॉमेडी मालिका घेऊन येणार आहे. 'पार्टनर्स' असं या कॉमेडी शोचं नाव असून यात जॉनी लीवर डबल रोलमध्ये पाहायला मिळेल. पोलिसांवर आधारीत हा शो असणार आहे.या शोमध्ये जॉनी लीवरसोबत किकू शारदा, असरानी, विपुल रॉय, किशोर मर्चेंट, श्वेता गुलाटी आणि अश्विनी कलेशकर यांचा अभिनय देखील पाहायला मिळणार आहे. यापूर्वी किकू शारदानं एफआयआर या मालिकेत पोलिसाची भूमिका साकारली होती. जवळजवळ ८ वर्ष किकूनं पोलिसाची भूमिका केली होती.या मालिकेत असरानी हे जॉनी लीवरचे वरिष्ठ दाखवले आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही मालिका सब टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हेही वाचा

प्रत्येक महिलांच्या आयुष्यातले ५ 'नॉट अच्छे दिन'

'पद्मावती'साठी वापरलं 400 किलो सोनं!


संबंधित विषय