Advertisement

प्रत्येक महिलांच्या आयुष्यातले ५ 'नॉट अच्छे दिन'


प्रत्येक महिलांच्या आयुष्यातले ५ 'नॉट अच्छे दिन'
SHARES

महिलांशी संबंधित अनेक विषयांवर आज खुलेपणानं चर्चा केली जाते. याच विषयांमधील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळी विषयी समाजात अनेत गैरसमजुती, न्यूनगंड आहेत. या सर्व गोष्टींवर अभिनेत्री कल्की कोचलीननं खुलेपणानं आपलं मत मांडलं आहे.




बॉलिवूड बबल या युट्यूब चॅनलवर कल्कीचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत कल्कीनं मासिक पाळीविषयी असणाऱ्या गैरसमजुतीवर टीका केली आहे. २ मिनिटं १८ सेकंदाचा हा व्हिडिओ असून यात सर्व मुद्दे स्पष्टपणे मांडण्यात आले आहेत.


'गर्ल्स को सताओ टॅक्स'

एवढंच नाही, तर या व्हिडिओत जीएसटीच्या मुद्द्यावरही भाष्य करण्यात आलं आहे. जीएसटीच्या मुद्द्याला अधोरेखीत करत या व्हिडिओला 'गर्ल्स को सताओ टॅक्स' असं नाव देण्यात आलं आहे.


असं का?

मासिक पाळीमध्ये असताना दिले जाणारे सल्ले व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकायला मिळतील. पाळीमध्ये याला हात लावू नका, देवाजवळ जाऊ नका असे अनेक सल्ले का दिले जातात. मासिकपाळी एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यात अपवित्र असं काही नाही. आधीच समाजात पाळीविषयी एवढ्या गैरसमजुती आहेत. त्यात सॅनिटरी पॅडवर कर लावण्यात आला आहे, हे सर्व मुद्दे मांडताना कल्कीच्या मनातील संताप दिसून येत आहे. व्हिडिओच्या शेवटी फक्त एक प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे आणि तो म्हणजे का?



हेही वाचा

मासिक पाळी..समज कमी, गैरसमज जास्त!

मासिक पाळीवर मोकळेपणानं बोला!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा