Advertisement

'पद्मावती'साठी वापरलं 400 किलो सोनं!


'पद्मावती'साठी वापरलं 400 किलो सोनं!
SHARES

भव्य सेट, भरजरी कपडे आणि दागिने ही संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाची खासियत! अर्थात 'पद्मावती' चित्रपटात देखील भन्साळी यांच्या या वैशिष्ट्यांची झलक पाहायला मिळणार यात शंका नाही. 'पद्मावती' चित्रपटाच्या कथेपेक्षा दीपिकानं घातलेला भरजरी लेहेंगा आणि दागिने सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.


वजन ऐकूनच अवाक् व्हाल!

दीपिकानं घातलेले कपडे आणि दागिने यांचं वजन ऐकून तुम्ही देखील अवाक् व्हाल! भन्साळींच्या चित्रपटासाठी दीपिकानं जवळपास ३५ किलोचा लेहेंगा घातला होता. त्यासोबत असलेल्या फक्त ओढणीचं वजनच चार किलो होतं! आणि हे फक्त वेशभूषेच्या बाबतीत झालं.



दागिन्यांबद्दल ऐकाल तर धक्काच बसेल. राणी पद्मावतीचे दागिने साकारण्यासाठी सुमारे ४०० किलो सोन्याचा वापर करण्यात आला. २०० कारागीर सुमारे ६०० दिवस हे दागिने बनवण्यासाठी मेहनत करत होते. तनिष्कनं पद्मावतीचे दागिने घडवले आहेत. नुकताच यासंदर्भातला एक व्हीडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.




त्यामुळे ऐतिहासिक भूमिका साकारण्यासोबतच दीपिकानं वेशभूषेचा भारही चांगल्या प्रकारे पेलला, असं म्हणायला काही हरकत नाही.



पद्मावती चित्रपटापूर्वी अनेक चित्रपटात वेशभूषेला अधिक महत्त्व देण्यात आलं आहे. या यादीत संजय लीला भन्साळी यांच्याच दोन चित्रपटांचा समावेश आहे. त्यापैकी एक म्हणजे 'बाजीराव मस्तानी'. 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात दीपिकाचा पायघोळ पोशाख २० किलोचा होता. या पेहरावात शूटिंग करणं तिच्यासाठी कठीणच झालं होतं. रीटेकवर रीटेक घेत कसंबसं दीपिकानं शूटिंग पूर्ण केलं.


'रामलीला'ही होता भारदस्त!

संजय लीला भन्साळींसोबतच दुसरा चित्रपट म्हणजे 'रामलीला'! 



'रामलीला' चित्रपटात दीपिकानं घातलेल्या घागऱ्याचं वजन अंदाजे ३൦ किलो होते. डिझाइनर अंजू मोदीनं हा घागरा डिझाइन केला होता.


ऐश्वर्यानंही पेललं होतं 20 किलो वजन!



ऐश्वर्या राय बच्चननं 'जोधा अकबर' या चित्रपटामध्ये महाराणी जोधाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी ऐश्वर्यानं लेहेंगा-चोली हा पोशाख घातला होता. तिनं घातलेल्या प्रत्येक पोशाखाचं वजन देखील २० किलो आहे. प्रत्येक पोशाखाची किंमत अंदाजे २ लाख रुपयांच्या घरात आहे. प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांनी हे पोशाख तयार केले होते.


'देवदास'मध्ये माधुरीसाठी 30 किलोंची वेशभूषा!



संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटामध्ये माधुरी दीक्षितनं चंद्रमुखीची भूमिका केली होती. या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षितवर चित्रित झालेल्या 'काहे छेड छेड मोहे' या गाण्यामध्ये माधुरीनं परिधान केलेल्या पोशाखावर पंधरा लाख रुपये खर्च करण्यात आले होते. या पोशाखाचं वजन तब्बल तीस किलो होतं!


अनुष्का तरी मागे कशी राहील?



फक्त ऐतिहासिक चित्रपटांमध्येच नाही, तर सध्याच्या काळातील चित्रपटांमध्ये देखील तुम्हाला अशी वेशभूषा पाहायला मिळते. 'ए दिल है मुश्किल' चित्रपटात 'चन्ना मेरे या मेरे या' गाण्यात अनुष्कानं घातलेल्या लेहेंग्याचं वजन ३५ किलो आहे. याशिवाय 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' चित्रपटामध्ये देखील वजनदार लेहेंगा वापरण्यात आला आहे. त्यामुळे आता वजनदार वेशभूषा ही हिंदी चित्रपटसृष्टीसाठी काही नवीन नाही.

प्रत्येक दिग्दर्शकानं काळानुसार अभिनेत्रींच्या पेहेरावात बदल केले आहेत. पण फक्त दिग्दर्शकाचं कौतुक करून चालणार नाही. अर्थात यामागे फॅशन डिझायनर आणि कारागिरांची देखील मेहनत आहे, हे नाकारून चालणार नाही!



हेही वाचा

श्रीदेवीचा हा लुक तुम्हाला घायाळ करून सोडेल!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा