श्रीदेवीचा हा लुक तुम्हाला घायाळ करून सोडेल!

'द बंगळुरु टाइम्स फॅशन वीक २൦१७'मध्ये श्रीदेवी ब्रायडल कलेक्शन परिधान करून रॅम्पवर उतरली होती. तिच्या त्या लुकमुळे संपूर्ण कार्यक्रमात सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या!

SHARE

सध्या सर्वत्र जान्हवी कपूरची जोरदार चर्चा आहे. जान्हवी कपूरच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. पण जान्हवी कपूरवर भारी पडतेय ती दुसरी तिसरी कुणी नसून तिचीच आई श्रीदेवी! श्रीदेवीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि या फोटोवरून तुमची नजरच हटणार नाही.

'द बंगळुरु टाइम्स फॅशन वीक २൦१७'मध्ये श्रीदेवी ब्रायडल कलेक्शन परिधान करून रॅम्पवर उतरली होती. श्रीदेवीनं लाल कलरचा लेहेंगा घातला होता. श्रीदेवीचं हे रूप पाहून ती ५४ वर्षांची आहे, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. या वयातही तिचं सौंदर्य आणि उत्साह वाखाणण्याजोगं आहे.

'द बंगळुरु टाइम्स फॅशन वीक २൦१७'मध्ये अनेक कलाकारांनी रॅम्पवॉक केलं. पण सर्वांमध्ये श्रीदेवीचा ब्राईडल लुक उठून दिसत होता. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या!हेही वाचा

अखेर कंगनानं उचलली तलवार...


संबंधित विषय