अखेर कंगनानं उचलली तलवार...

  Mumbai
  अखेर कंगनानं उचलली तलवार...
  मुंबई  -  

  'क्वीन' कंगनानं झासीच्या राणीचं रूप धारण करत तलवार उचलली आहे. एक मिनिटं ती काय तिच्या विरोधकांवर हल्ला वैगरे करणार नाही आहे. तर ही तलवार तिनं तिच्या आगामी चित्रपटासाठी उचलली आहे.

  सर्व वाद-विवाद आणि आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रापासून स्वत:ला दूर सारत क्वीन कंगनानं आपलं पूर्ण लक्ष आगामी चित्रपटाकडे वळवलं आहे. 'मणिकर्णिका क्वीन ऑफ झासी' या चित्रपटासाठी कंगना बरीच मेहनत घेत आहे. या चित्रपटात ती झासीच्या राणीची व्यक्तीरेखा साकारणार आहे. या चित्रपटासाठी ती घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहे. हातामध्ये तलवार घेऊन कंगना सराव करताना या व्हिडिओत दिसत आहे. दिवाळीनंतर कंगना चित्रपटाच्या शूटिंगसाठी जोधपूरला जाणार आहे.  झाशीच्या राणीची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार म्हणून या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. कंगनासोबतच या चित्रपटात अभिनेता अतुल कुलकर्णी, अंकिता लोखंडेही झळकणार आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा अंदाज आहे.
  हेही वाचा

  अंगावर काटा आणणारा 'दि हाऊस नेक्स्ट डोअर'

  कंगना आणि हृतिकमध्ये रणबीरसुद्धा!
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.