अंगावर काटा आणणारा 'दि हाऊस नेक्स्ट डोअर'


SHARE

साऊथ आणि हिंदी इंडस्ट्रीतला स्टार सिद्धार्थचा 'दि हाऊस नेक्स्ट डोअर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि इताकी एन्टरटेन्मेटची निर्मिती आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला चित्रपट निर्माते अजित अंधारे, दिग्दर्शक मिलिंद राव, अभिनेता सिद्धार्थ, एन्ड्रिया जेरेमिया आणि अतुल कुलकर्णी उपस्थित होते.'दि हाऊस नेक्स्ट डोअर' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट हॉरर असून चित्रपटाचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. 

चित्रपटाचे निर्माते अजित अंधारे म्हणाले, 'चित्रपटाची कथा ऐकताच आम्हाला पसंत पडली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला हॉरर चित्रपट बनवण्याची इच्छा होती. त्यामुळे हा चित्रपट बनवण्याचा आम्ही निर्णय घेतला.'

अतुल कुलकर्णी आणि सिद्धार्थ ११ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहे. ११ वर्षांपूर्वी ते 'रंग दे बसंती' या हिंदी चित्रपटात एकत्र दिसले होते. आता 'दि हाऊस नेक्स्ट डोअर' चित्रपटात ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ३ नोव्हेंबर २൦१७ ला प्रदर्शित होत आहे.हेही वाचा - 

राजकुमार राव म्हणतोय 'शादी में जरूर आना'

तू न थकेगा कभी, तू ना रूकेगा कभी...डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या