Advertisement

तू न थकेगा कभी, तू ना रूकेगा कभी...


तू न थकेगा कभी, तू ना रूकेगा कभी...
SHARES

'रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है, नाम है शहनशहा...' अशा दमदार डायलॉग आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन यांचा आज पंचाहत्तरावा वाढदिवस. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. १९७൦ च्या दशकात त्यांना 'एंग्री यंग मॅन' अशी ख्याती चित्रपटात साकारलेल्या भूमिकांमुऴे मिळाली होती. चार दशकांहून अधिक मोठ्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. 


'बच्चन' नाही खरे आडनाव

११ ऑक्टोबर १९४२ साली अमिताभ बच्चन यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद इथं झाला. अमिताभ यांचे वडिल डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते. तर त्यांची आई मूळच्या फैसलाबाद (पाकिस्तान) इथल्या होत्या. अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' होते. पण ते 'बच्चन' या टोपणनावानं कविता प्रसिद्ध करत. त्यामुळे चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी 'बच्चन' हे टोपणनाव आडनाव म्हणून ठेवले. नाहीतर अमिताभ यांचे खरे अमिताभ श्रीवास्तव असते.


सौजन्य


वडिलांना अमिताभ नाही तर 'हे' नाव ठेवायचे होते

डॉ. हरिवंशराय बच्चन यांना अमिताभ यांचे नाव इन्कलाब  ठेवायचे होते. पण कवी सुमित्रानंदन यांच्या सल्यामुऴे त्यांनी अमिताभ हे नाव ठेवले


अमिताभ यांना इंजिनियर व्हायचे होते, पण...

अमिताभ बच्चन यांनी अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधनी आणि बॉईज हायस्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नैनितालच्या शेरवूड कॉलेजमध्ये त्यांनी आर्ट्स विषयात डबल मास्टर डिग्री संपादित केली. त्यानंतर दिल्ली विद्यापिठाच्या किरोडिमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानात पदवी संपादित केली. दिल्लीतून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पहिली नोकरी कोलकातातील एका शिपिंग कंपनीत केली. त्यावेळी त्यांना ५०० रुपये पगार होता. तर दुसरी नोकरी एजंट म्हणून कोलकात्तामध्येच केली. एजंटची नोकरी सोडून अमिताभ यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.


सौजन्य


जया बच्चन नव्हत्या पहिलं प्रेम

अमिताभ बच्चन यांचे पहिले प्रेम जया बच्चन नव्हत्या. तर त्यांचे पहिले प्रेम एका ब्रिटीश कंपनीत काम करणारी एक मराठी मुलगी होती. त्यावेळी ते कोलकात्तात नोकरी करत होते. त्यांना तिच्याशी विवाह देखील करायचा होता. पण काही कारणास्तव शक्य झालं नाही. त्यामुळे बिग बी कोलकात्ता सोडून मुंबईत स्थायिक झाले.


आवाजामुळे रिजेक्ट झाले होते

अमिताभ अभिनयासोबतच त्यांच्या भारदस्त आवाजासाठी देखील ओळखले जातात. अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ यांनी आलोचकाची (आवाज) भूमिका बजावली आहे. पण एकेकाळी हाच आवाज रिजेक्ट करण्यात आला होता. ऑल इंडिया रेडिओच्या नोकरीसाठी गेले असता आवाजामुळे त्यांना रिजेक्ट केले होते. पण अभिनय क्षेत्रात त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मृणाल सेन यांच्या बंगाली सिनेमाला व्हॉईस ओव्हर देऊन केली होती. त्यानंतर १९७७ मध्ये 'शतरंज के खिलाडी' या चित्रपटासाठी देखील अमिताभ यांच्या आावाजाचा वापर केला होता.


सौजन्य

अनेक रात्र रस्त्यावर काढली

मुंबईत बिग बींकडे राहण्यास घर नव्हते. तेव्हा अनेक रात्र त्यांनी रस्त्यावर काढली होती. तर काही दिवस अमिताभ मेहमूद यांच्या घरी देखील वास्तव्यास होते.


'या' चित्रपटातून अभिनय करिअरला सुरुवात

'सात हिंदुस्थानी' (१९६९) या चित्रपटातून त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 'भुवन शोम', 'परवाना' आणि 'आनंद' या चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवली. 'आनंद'साठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला.


एंग्री यंग मॅन

'जंजीर' हा बिग बींचा पहिला हिट सिनेमा होता. त्यानंतर 'दीवार', 'जमीन', 'शोले', 'कुली', 'डॉन', 'मुकद्दर का सिकंदर' आणि 'शहनशहा' यांसारख्या चित्रपटांमुळे अमिताभ यांना 'एंग्री यंग मॅन ' ही ओळख मिळाली.



तू न थकेगा कभी,
तू ना रूकेगा कभी,

डॉ. हरिवंशराय बच्चन यांनी जणू ही कविता अमिताभ बच्चन यांच्यासाठी लिहली आहे. कारण चार दशकांनंतरही अमिताभ न थकता, न थांबता चालत आहेत. गेली ४८ वर्षे ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. तुम जियो हजारो साल... 'मुंबई लाइव्ह'कडून अभिनयाच्या महानायकाला शुभेच्छा....




हेही वाचा - 

बिग बींना राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून शुभेच्छा

हॅपी बर्थडे 'बिग बी'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा