राजकुमार राव म्हणतोय 'शादी में जरूर आना'

  'शादी में जरूर आना' या राजकुमार रावच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या चित्रपटाची कथा लव्ह-हेट रिलेशनशीपवर आधारीत आहे.

  Mumbai
  राजकुमार राव म्हणतोय 'शादी में जरूर आना'
  मुंबई  -  

  मराठी दिग्दर्शक अमित मसुरकरच्या 'न्यूटन' या चित्रपटामुळे अभिनेता राजकुमार राव यानं चांगलंच नाव कमावलं. शिवाय 'न्यूटन' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. न्यूटननंतर राजकुमार राव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका नव्या चित्रपटातून.

  'शादी में जरूर आना' या राजकुमार रावच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या चित्रपटाची कथा लव्ह-हेट रिलेशनशीपवर आधारीत आहे.
  या चित्रपटात राजकुमार सत्येंद्र मिश्रा या सर्वसामान्य तरूणाची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री क्रिती खरबंदा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आरती शुक्लाची भूमिका साकारत आहे. अरेंज मॅरेजसाठी हे दोघे भेटतात. त्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण लग्नाच्या दिवशी आरती पळून जाते आणि इथूनच राजकुमारचा सुडाचा खेळ सुरू होतो. त्यानंतर पुन्हा त्याची ओळख आरतीशी होते. 

  'प्यार खतम वॉर शुरू' म्हणत राजकुमारच्या सुडाचा प्रवास सुरू होतो. १० नोव्हेंबरला 'शादी में जरूर आना' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  हेही वाचा -

  'हा' अभिनेता साकारणार कपिल देव यांची भूमिका!

  कल्की कोचलीनच्या 'रिबन'चा ट्रेलर लाँच  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.