कल्की कोचलीनच्या 'रिबन'चा ट्रेलर लाँच


SHARE

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन वेगळ्या धाटणीच्या भूमिका आणि चित्रपटांसाठी नेहमीच ओळखली जाते. तिच्या चित्रपटांची कथा ही हटके असते. अशीच एक हटके कथा घेऊन कल्की पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कल्कीच्या आगामी रिबन या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये कल्कीसोबत वेब सीरीज सुमित व्यासचीही मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. यात सुमीत कल्कीच्या पतीची भूमिका साकारत आहे.रिबन ही एक लव्ह स्टोरी आहे. लग्नानंतर आयुष्यात येणारे चढ-उतार आणि एकूणच पती-पत्नीच्या संबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. राखी शांडिल्य दिग्दर्शित हा चित्रपट ३ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.हेही वाचा

'पद्मावती'तील रणवीर सिंहच्या 'अलाउद्दीन खिलजी'चा लूक आऊट


संबंधित विषय