Advertisement

'पद्मावती'तील रणवीर सिंहच्या 'अलाउद्दीन खिलजी'चा लूक आऊट


'पद्मावती'तील रणवीर सिंहच्या 'अलाउद्दीन खिलजी'चा लूक आऊट
SHARES

'पद्मावती' या सिनेमातील अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांचा फस्ट लूक नुकताच रिलीज झाला. त्यानंतर आता पद्मावती सिनेमात आलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंह याचाही फस्ट लूक आऊट झाला आहे.

डोळ्यांत राग, दाढी आणि लांब केस असा त्याचा हा नवीन लूक आहे. या सिनेमात तो अत्यंत वेगळा आणि भयंकर दिसत आहे. पद्मावती या सिनेमात त्याने साकारलेली अल्लाउद्दीनची ही भूमिका नकारात्मक असून या भूमिकेसाठी त्याने खूपच मेहनत घेतली आहे. पण आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती हा सिनेमा प्रदर्शित होण्याची.


रणवीर सिंहने यापूर्वी दीपिका पादुकोणसोबत रामलीला आणि बाजीराव मस्तानी या सिनेमात काम केले होते. ज्याला रसिकप्रेक्षकांनीही चांगलीच पसंती दिली होती.


हेही वाचा - 

दाढी मिशांमध्ये असा दिसतो शाहिद कपूर


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा