Advertisement

दाढी मिशांमध्ये असा दिसतो शाहिद कपूर


दाढी मिशांमध्ये असा दिसतो शाहिद कपूर
SHARES

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' या सिनेमातील दीपिका पदुकोणचा फस्ट लूक नुकताच रिलीज झाला. त्यापाठोपाठ आता या सिनेमात महारावल रतन सिंहची भूमिका साकारत असलेला अभिनेता शाहिद कपूरचाही फस्ट लूक जारी झाला आहे. शाहिदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचा हा फस्ट लूक प्रेक्षकांसमोर सादर केला आहे.

या पोस्टरमध्ये शाहिद दाढी आणि मिशांमध्ये दिसत आहे. त्याच्या कपाळावर टीळा असून तो शाही अंदाजात दिसत आहे. पद्मावती या सिनेमात दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणार आहे.

या सिनेमात आतापर्यंत शाहिद आणि दीपिकाचा फस्ट लूक जारी झाला आहे. पण आता दर्शक अलाउद्दीन खिलजीची व्यक्तीरेखा साकारत असलेल्या रणवीर सिंह याच्या फस्ट लूकची वाट बघत आहे. पद्मावती हा सिनेमा 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा