प्रेमाची ५१ वर्षे...


SHARE

बॉलिवुडमधले एव्हर ग्रीन कपल म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार आणि सायरा बानो! या जोडप्यानं नुकतीच त्यांच्या सहजीवनाची ५१ वर्ष पूर्ण केली आहेत. हा आनंदाचा क्षण त्यांनी पाली हिल इथल्या राहत्या घरी मित्र आणि कुटुंबियांसोबत साजरा केला. या वेळचे काही फोटो त्यांनी ट्विटरवर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.'आमच्या लग्नाच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त आम्हाला दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार मानतो. आम्ही हा वाढदिवस मित्र परिवारासोबत साजरा केला. पाली हिलची प्रॉपर्टी दिलीप कुमार यांना कोर्टातल्या मोठ्या लढाईनंतर मिळालीय,' अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.१२ वर्षांच्या असल्यापासून सायरा दिलीप यांच्या प्रेमात!

सायरा बानो वयाच्या १२ वर्षांच्या असल्यापासून दिलीप यांच्या प्रेमात पडल्या होत्या. सायरा यांचं शिक्षण लंडनमध्ये पूर्ण झालं होतं. पण सुट्टीच्या दिवसांमध्ये त्या मुंबईत येत असत. तेव्हापासून त्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. एका मुलाखतीत सायरा बानो म्हणाल्या होत्या की, 'मी नेहमी प्रार्थना करायचे, की मला अभिनेत्री बनव आणि माझे लग्न दिलीप कुमार यांच्याशी होऊ दे, मी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला आणि माझे स्वप्न पूर्ण झाले.'


सायरासोबत दिलीप यांनी नाकारला होता चित्रपट

१९५९ साली सायरा बानो यांनी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. 'जंगली' या चित्रपटात सायरा बानो यांना शम्मी कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांना दिलीप कुमार यांच्यासोबत चित्रपटात काम करायचे होते. पण सायरा बानो तेव्हा खूप लहान होत्या. त्यांच्या वयात अंदाजे २൦-२२ वर्षांचा फरक होता. 'लहान अभिनेत्रींसोबत काम करणार नाही,' असं म्हणून दिलीप यांनी सायरा बानोंसोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिला.कसे झाले लग्न?

सायरा यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत १९६६ मध्ये लग्न केले. लग्नाच्या वेळी सायरा यांचे वय २२ वर्षे होते. तर दिलीप कुमार यांचे वय ४४ वर्षांचे होते. वयामध्ये एवढे अंतर होते की, त्यामुळे त्यांचे लग्न किती काळ टिकेल, यावर संशय व्यक्त केला जात होता. पण वयातल्या या फरकामुळेच आमचे नाते अधिक मजबूत राहिले, असे सायरा बानो ठामपणे सांगतात.


सायरा, दिलीप आणि ती

१९७९ मध्ये दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या आयुष्यात एक वादळ आलं. त्या वादळाचं नाव होतं अस्मा. दिलीप कुमार यांनी ३൦ मे १९८൦ रोजी तिच्याशी लग्न केलं. २२ जून १९८३ साली दोघांमध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर दिलीप कुमार हे पुन्हा सायरा बानो यांच्यासोबत राहू लागले.हेही वाचा

अखेर कंगनानं उचलली तलवार...


संबंधित विषय