'सिमरन'चा ट्रेलर प्रदर्शित

  Mumbai
  'सिमरन'चा ट्रेलर प्रदर्शित
  मुंबई  -  

  कंगना राणौतचा बहुप्रतिक्षित चित्रपट सिमरनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये कंगनाचा 'हॅपी गो लकी' अंदाज पाहायला मिळतोयएनआरआय संदीप कौरच्या आयुष्यावर सिमरनची कथा आधारीत आहेकंगनाचे अनेक सिनेमे हे स्त्रीप्रधान आहेत. तसेच या चित्रपटाच्या बाबतीत बोलता येईल. या चित्रपटातही कंगनावरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.  


  हंसल मेहता दिग्दर्शित सिनेमात कंगना 'सिमरन' नावाची व्यक्तीरेखा साकारत आहे. ट्रेलरमध्ये कंगना मजा, मस्ती आणि जीवनाचा आनंद लुटताना दिसत आहे. या चित्रपटात कंगनाला जुगार खेळण्याचे आणि चोरी करण्याचे व्यसन असते. इतकेच नाही तर कंगना अनेक मुलांसोबत फ्लर्ट करताना दिसेलया चित्रपटाचे शूटिंग अमेरिकेत झाले आहेसिमरन सिनेमाची निर्मिती भूषण कुमारकृष्ण कुमार आणि अमित अग्रवाल यांनी केलीय


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.