'नाम शबाना'मध्ये तापसी पन्नूचे खतरनाक स्टंट

Mumbai

See all
मुंबई  -  

मुंबई - 'नाम शबाना' या सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नू तुम्हाला खतरनाक स्टंट करताना दिसणार आहे. यासाठी तिला मार्गदर्शन करतोय मिस्टर खिलाडी अक्षय कुमार. अक्षय कुमारच्या आगामी 'नाम शबाना' चित्रपटामध्ये तापसी पन्नू प्रमुख भुमिकेत दिसणार आहे आणि ज्यात तिची स्टंटबाजी असणार आहे. मार्शल आर्टसाठी गेली 20 वर्षे प्रसिद्ध असलेला 'अक्की' स्वत: तापसी पन्नूला प्रशिक्षण देत आहे. तापसीने 6 महिन्याच्या मार्शल आर्टच्या ट्रेनिंगमध्ये भाग घेतला असून, तिच्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. अक्षय कुमार आणि त्याची विशेष टीम आतापर्यंत 18 हजार मुलींना मार्शल आर्टचं प्रशिक्षण देत आहे. आता हिच टीम तापसी पन्नूला देखील तयार करत आहे. 'नाम शबाना' चित्रपटात तापसी एका एजंटच्या भुमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर आणि प्रोमोमध्ये देखील तपासीचे स्टंट दाखवण्यात आले आहेत.

या चित्रपटात तापसीसोबत अक्षय कुमार, मनोज बाजपेयी, मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नीरज पांडे दिग्दर्शित ‘नाम शबाना’ हा चित्रपट येत्या 31 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

‘नाम शबाना’ या चित्रपटाचे कथानक 2015 मध्ये आलेल्या ‘बेबी’ चित्रपटातील शबानाच्या व्यक्तिरेखेवर आधारलेले आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.