मनसे गुंडांचा पक्ष - बाबुल सुप्रियो

 Pali Hill
मनसे गुंडांचा पक्ष - बाबुल सुप्रियो

बांद्रा - केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो हे निर्माता करण जोहरच्या पाठिशी उभे राहिलेत. करणच्या ए दिल है मुश्किल सिनेमाला विरोध केल्यावनं बाबुल सुप्रियो यांनी मनसेला दारेवर धरलंय. मनसे हा गुंडांचा पक्ष असल्याची जळजळीत टीका केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी केलीय. चित्रपटाबाबतचा निर्णय प्रेक्षकांना घेऊ द्या असं आवाहनही सुप्रियोंनी केलंय.

‘ऐ दिल है मुश्कील’ची मुश्कील वाढल्यानं प्रोड्युसर्स असोसिएशननं थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना साकडं घातलं. दिग्दर्शक मुकेश भट, सिद्धार्थ रॉय कपूर, अपूर्व मेहता या निर्माता दिग्दर्शकांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी बाबुल सुप्रियोसुद्धा उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी ‘ऐ दिल है मुश्किल’ला पूर्ण सुरक्षा देण्याचं आश्वासन दिल्याचं मुकेश भट यांनी सांगितलं आहे.

Loading Comments