'मौलवीचे आव्हान स्वीकारत सोनूने केले मुंडन'

 Versova
'मौलवीचे आव्हान स्वीकारत सोनूने केले मुंडन'
Versova, Mumbai  -  

मशिदीत होणाऱ्या अजान विरोधात गायक सोनू निगम यांने आवाज उठवला. त्याने यासंदर्भात ट्विट केल्यानंतर सोनू निगमवर अनेकांनी टीका केली तर काहिंनी त्याला पाठिंबाही दर्शवला. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सोनू निगमने आपली भूमिका स्पष्ट केली. "कोणाचंही मन दुखवण्याचा माझा हेतू नाही. मी फक्त अजानबद्दल व्यक्तव्य केले नव्हते तर मंदिर आणि गुरुद्वाराबद्दलही बोललो होतो. माझा फक्त लाऊडस्पीकरला आणि आवाजाला विरोध आहे," असे सोनूने स्पष्ट केले. तसेच "प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे," अशी प्रतिक्रीया सोनूने दिली.

त्यानंतर एका मौलवीने सोनू निगमचे केस कापणाऱ्याला १൦ लाख देण्यात येतील असे जाहिर आव्हान केले होते. त्यानुसार सोनू निगमने ट्वीट करत "१൦ लाख तयार ठेवा" असं म्हणत हे आव्हान स्वीकारले होते.

सोनूने सेलिब्रिटी हेअर स्टाइलिस्ट आलीम हकिम याच्याकडून स्वत:चे मुंडन करून घेतले. त्यामुळे टक्कल करणाऱ्या हेअर स्टाइलिस्ट आलीम हकिमला फतवा काढणाऱ्या मौलवीने आता दहा लाख रुपये द्यावे, असे प्रतिआव्हान सोनूने केले. सोनूने मुंडन केल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी त्याला पाठिंबा दर्शवला.


Loading Comments