पाकिस्तानी कलावंतांचे 'बुरे दिन' सुरू?

 Pali Hill
पाकिस्तानी कलावंतांचे 'बुरे दिन' सुरू?
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - ​​महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलावंतांविरोधात जाहीर रोखठोक भूमिका घेतल्यामुळे आता मनोरंजनाच्या क्षेत्रातही त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पाकिस्तानी कलावंतांचा सहभाग असलेली मालिका बंद करण्याचा​​ निर्णय घेणा-या झी पाठोपाठ आता कलर्स वाहिनी आणि रेडिओ मिर्चीनेही मनसेची भूमिका मान्य केली आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलावंतांचे भारतातील बुरे दिन सुरू झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्करातील 18 जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे मनसेने कडक पवित्रा घेतला,मात्र मनसेच्या भूमिकेला मनोरंजन क्षेत्रातूनही मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

Loading Comments