Advertisement

'त्या' प्रकरणी दिग्दर्शक महेश मांजरेकरांविरोधात गुन्हा दाखल

आपल्या चित्रपटांच्या दिग्दर्शनानं नेहमी चर्चेत असणारे दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

'त्या' प्रकरणी दिग्दर्शक महेश मांजरेकरांविरोधात गुन्हा दाखल
SHARES

आपल्या चित्रपटांच्या दिग्दर्शनानं नेहमी चर्चेत असणारे दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटातील दाखवेल्या दृश्यांमुळं या चित्रपटाचा ट्रेलर वादग्रस्त ठरला होता. दरम्यान, या चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह दृश्यांमुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतं.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवल्याने महेश मांजरेकर यांच्या विरोधात कलम २९२, ३४ तसेच पोस्को कलम १४ आणि IT कलम ६७ व ६७ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. महेश मांजरेकर यांच्याकडून अद्याप याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेली नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा