नकटीला बघायला येणार सेलिब्रिटी

Mumbai
नकटीला बघायला येणार सेलिब्रिटी
नकटीला बघायला येणार सेलिब्रिटी
See all
मुंबई  -  

मुंबई - हलक्याफुलक्या ढंगाने रंगणाऱ्या गोष्टीत धम्माल आणणार आहेत ते नकटीला बघायला येणारी वर मंडळी. दर आठवड्याला या मालिकेत सेलिब्रिटी वरमंडळीची हजेरी लागणार आहे. ज्यामध्ये अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, शशांक केतकर, अवधूत गुप्ते आणि इतर बरेच लोकप्रिय कलाकार बघायला मिळणार आहेत. या सर्वांच्या व्यक्तिरेखाही तेवढ्याच धम्माल पद्धतीने लिहिण्यात आल्या आहेत. याचं आदरातिथ्य करतांना देशपांडे कुटुंबांची उडणारी तारांबळ, प्रत्येक मुलगा कसा योग्य आहे, नूपुरला पटवून देताना त्यांच्या नाकी नऊ येणार आणि काही ना काही कारण देत नूपुर त्या मुलाला नकारही देणार.
या मालिकेत नूपुरच्या भूमिकेत आहे लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी. याशिवाय मालिकेत संजय सुगावकर, पौर्णिमा तळवलकर, आसित रेडीज, वर्षा दांदळे, शकुंतला नरे, रागिनी सामंत, सोनाली पंडित, आनंदा कारेकर, अभिनय सावंत, अभिजीत आरकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अतुल केतकर आणि अपर्णा केतकर यांच्या राईट क्लिक मीडिया सोल्युशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे गौतम कोळी यांनी. किरण कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांची पटकथा तर प्रल्हाद कुडतरकर यांचे संवाद आहेत.
बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वा. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ तर 10 वा. ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ असा मनोरंजनाचा डबल धमाका झी मराठीच्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.