Advertisement

'चला हवा येऊ द्या'मधील हा कलाकार अडकणार लग्नबंधनात


'चला हवा येऊ द्या'मधील हा कलाकार अडकणार लग्नबंधनात
SHARES

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात, ते त्यातील कलाकार श्रेया बुगडे, भाऊ कदम, निलेश साबळे, कुशल बद्रीके, सागर कारंडे, विनीत भोंडे. यांच्या कॉमेडीच्या टायमिंगने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या सगळ्यांमध्ये उंचीने कमी असला तरी आपल्या अभिनयाने उंच असलेला सगळ्यांचा लाडका अभिनेता विनीत भोंडे लवकरच बोहल्यावर चढणार आहे.


४ मार्चला अडकणार लग्नबंधनात

विनित हा सोनम पवारबरोबर लग्न बंधनात अडकणार आहे. त्याचा साखरपूडा नुकातच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये पार पडला. विनीत आणि सोनम यांचं हे अॅरेंज मॅरेज आहे. सोनम ही मूळची सोलापूरची आहे. तीने पुण्यामध्ये नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. येत्या ४ मार्चला विनीत बोहल्यावर चढणार आहे.

४ मार्चपासून 'चला हवा येऊ द्या' प्रामणेच विनितच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. गेले १० वर्ष विनित अभिनय क्षेत्रात आहे. विनितने मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्रात बी. ए केलं आहे. थुकरटवाडीच्या मंचावर विनितने कायमच प्रेक्षकांना पोटधरून हसवलं. कधी लहान मुल होऊन तर कधी हवलादार आणि कधी बाईची भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विनितने डोंबिवली फास्ट या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा