Advertisement

एनसीपीएमध्ये चायना फिल्म फेस्टिव्हल


एनसीपीएमध्ये चायना फिल्म फेस्टिव्हल
SHARES
Advertisement

विले पार्ले - चायना फिल्म फेस्टिव्हल सप्ताहाचं उद्घाटन शुक्रवारी विलेपार्लेतल्या सनसिटी चित्रपटगृहात झालं. इंडिया चायना फिल्म सोसायटी आणि चायना फिल्म असोशिएशनतर्फे या चित्रपट सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. उद्घाटन कार्यक्रमाला व्ही. शांताराम यांच्या कन्या आणि दिग्दर्शिका मधुरा पंडित जसराज, चायना फिल्म असोशिएशनचे डायरेक्टर झुबिलीन, चायना फिल्म ग्रुपचे अध्यक्ष ज्यो हॉंगफेन आणि जपान फिल्म असोशिएशनचे डायरेक्टर टाकामिची यामाझाकी उपस्थित होते.

नरिमन पॉईंटच्या एनसीपीए थिएटरमध्ये 23 ते 27 ऑक्टोबर दरम्यान या फेस्टिव्हलचे चित्रपट सादर होतील. यात चीनचे आठ प्रसिद्ध चित्रपट पाहता येणारायेत. यात सी. झेड १२, इफ यू आर द वन, मिस ग्रेनी, मंकी किंग हिरो इज बॅक, मॉन्स्टर हंट, द अनएक्सपेक्टेड, मनी ऑन द रोड, थ्रू स्टनिंग स्ट्रोम आदी चित्रपट इंग्रजी सबटायटलसह दाखवले जातील.

संबंधित विषय
Advertisement