Advertisement

'मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू...', उर्फी जावेदने पुन्हा डिवचले

आता उर्फीने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्वीट केली असून ते चर्चेत आहे.

'मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू...', उर्फी जावेदने पुन्हा डिवचले
SHARES

आपल्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद शमण्याची सध्या तरी चिन्ह दिसत नाहीयेत. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी उर्फीला धारेवर धरले. पण उर्फीदेखील काही कमी नाही. ती त्यांना डिवचण्याची एकही संधी हातून जाऊ देत नाहीये. आता उर्फीने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्वीट केली असून ते चर्चेत आहे.

उर्फीने आज तिच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्वीट केले आहे. यात ती म्हणतेय, 'मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू...' तिचे हे ट्वीट बरेच व्हायरल होत आहे. यावर नेटकरीदेखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

काय आहे नेमका वाद?
चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वादाला सुरुवात सोशल मीडियावरुन झाली. ट्वीटरवरुन सुरु झालेला वाद आता विकोपाला पोहोचला आहे. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांना पत्र देत उर्फीविरोधात कारवाईची मागणी केली होती. इतकेच नाही तर जिथे दिसशील तिथे कानाखाली देईल, असा इशारादेखील त्यांनी तिला दिला होता. उर्फीचा नंगटपणा चालू देणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.


अरे..हे काय चाललयं मुंबईत रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई.. हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे काही कलम आहेत की नाही. तत्काळ बेड्या ठोका हिला एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये. असे ट्वीट चित्रा वाघ यांनी 30 डिसेंबर रोजी केले होते.

बलात्काऱ्यांसाठी माझ्या कपड्यांना दोष देणे सहज सोपे आहे. माझ्यावर लक्ष केंद्रीत करून जनतेची दिशाभूल करताय. ज्यांना खरंच तुमच्या मदतीची गरज आहे? तुम्ही अशा महिलांची मदत का करत नाही. महिलाचे शिक्षण, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणे अशा गोष्टींवर तुम्ही का काही करत नाही?, असा सवाल उर्फीने चित्रा वाघ यांना विचारला होता.हेही वाचा

रोहित शेट्टी मराठी कलाकारांना चित्रपटात संधी का देतो? म्हणाला, महाराष्ट्राचा...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा