मुंबईत रंगली कोल्ड प्लेची धूम

Santacruz
मुंबईत रंगली कोल्ड प्लेची धूम
मुंबईत रंगली कोल्ड प्लेची धूम
See all
मुंबई  -  

वांद्रे - वांद्र्याच्या एमएमआरडीएच्या मैदानावर कोल़्ड प्लेचा थरार मुंबईकरांनी अनुभवला. कोल्ड प्ले हा जागतिक दर्जाचा बॅण्ड प्रथमच भारतात येत होता म्हणून या महोत्सवाला तरुणांनी भरपूर प्रतिसाद दिला. भर उन्हात देखील ही तरुणाई आत जाण्यासाठी रांगेत उभी असल्याची चित्रे दिसून आलं. परंतु हा महोत्सव निर्विघ्न पार पडावा म्हणून बीकेसी पोलिसांचा चोक बंदोबस्त होता. या महोत्सवनिमित्त बीकेसी च्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. कोल्ड प्ले बॅण्ड ऐकण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून तरुणाई उपस्थित होती. विदेशी बॅण्ड असला तरी नशा बंदी असल्यामुळे तरुणाईने समाधान व्यक्त केलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.