Advertisement

बिग बॉसच्या घरात रंगला 'चोर पोलिसा'चा खेळ


बिग बॉसच्या घरात रंगला 'चोर पोलिसा'चा खेळ
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बुधवारी चोर पोलिसचा खेळ रंगला. लहानपणी आपण वेगवेगळे खेळ खेळले असतीलच पण हा उत्कंठावर्धक खेळ आपण गंमत म्हणून खेळलो असलो तरी आता या घरामध्ये मात्र या खेळामुळे अनेक निर्णय घेण्यात येतील, याची पूर्वकल्पना बिग बॉसने स्पर्धकांना दिली होती.


'या' सदस्यांमध्ये वाद

या खेळादरम्यान झालेल्या काही गोष्टींमुळे मेघा आणि स्मिता यांच्यात भांडण होणार आहे. ज्याचं कारण प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये कळेलच. बिग बॉसच्या घरामध्ये चोर पोलिसचा खेळ बराच वेळ रंगला असून घरातील काही सदस्यांमध्ये म्हणजेच मेघा, उषाताई आणि रेशम यांच्यात काही कारणांमुळे वाद होणार आहेत. ज्यामध्ये रेशमने उषाजींना बजावले आहे की, मागून बोलण्यापेक्षा मला समोरून बोललेलं जास्त आवडेल...

या तिघांमध्ये झालेला हा वाद कुठल्या टोकापर्यंत गेला? मेघा आणि स्मितामध्ये वाद का झाला? आणि बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये घरातील सदस्यांना यश मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गुरुवारच्या भागामध्ये मिळणार आहेत.


गुरुवारच्या भागात काय?

गुरुवारच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांना बिग बॉस गार्डन एरियामध्ये एका लाल रंगाच्या चौकटीमध्ये उभं रहाण्यास सांगणार असून, त्या चौकटीबाहेर जाण्यास सदस्यांना सक्त मनाई आहे. लाल चौकट असलेली जागा सदस्यांच्या हक्काची असून उर्वरित घर त्यांच्यासाठी बंद रहणार आहे आणि दिवस अखेरपर्यंत घरावर सदस्यांना ताबा मिळवायचा आहे. दिवसा अंती घराच्या ज्या भागावर सदस्यांचा ताबा नसेल ती जागा अनिश्चित कालावधीपर्यंत सदस्यांना वापरता येणार नाही, असं देखील बिग बॉस सूचित करणार आहेत. तेव्हा आता घरामधील सदस्य कुठकुठल्या जागेवर ताबा मिळवू शकतील? हे बघणं रंजक असणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा