Advertisement

भारती म्हणते 'दुल्हा हम ले जाऐंगे'!


भारती म्हणते 'दुल्हा हम ले जाऐंगे'!
SHARES

अफलातून कॉमेडीनं सर्वांना पोट धरून हसायला लावणारी कॉमेडियन भारती सिंग लेखक हर्ष लिंबाचियासोबत लवकर लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच तिचे प्री-वेडिंग फोटोशूट झाले. प्री-वेडिंग फोटोशूटचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटोशूट देखील मजेशीर झाले. ती नेहमीच सर्वांना हसवते. तिचे हे फोटो पाहून देखील तुम्हाला हसू आवरणार नाही!




https://www.instagram.com/p/BbOXbBcFEEI/" style=" color:#000; font-family:Arial,sans-serif; font-size:14px; font-style:normal; font-weight:normal; line-height:17px; text-decoration:none; word-wrap:break-word;" target="_blank">If I did anything right in my life, it was when I gave my heart to you @haarshlimbachiyaa30 Outfit by: @the_adhya_designer styled by: @shailshricouture@akashidesignerstudio ????by : @luvisrani #25daystogo #bhartikibaraat #bhartiwedshhaarsh

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen) on


भारतीनं तिच्या इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिले आहे की, 'मी माझ्या आयुष्यात जर काही चांगले काम केले असेन, तर ते हेच की मी माझं हृद्य तुला दिलं'. फोटोतील भारतीचा अंदाज मजेशीर आहे. भारतीनं या फोटोमध्ये हर्षला खांद्यावर उचलून घेतलं आहे आणि फोटोवर 'दुल्हा हम ले जाऐंगे' असं कॅप्शन दिलं आहे.



प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला भारतीच्या लग्नाचा ड्रेस डिझाइन करणार आहे. नीतानं भारतीच्या लग्नासाठी नारंगी रंगाचा अनारकली ड्रेस डिझाइन केला आहे. भारती आणि हर्ष 3 डिसेंबरला लग्न बंधनात अडकणार असून गोव्याला त्यांचं लग्न होणार आहे.



हेही वाचा

'पद्मावती'त 'तो' सीनच नाही, भन्साळी यांनी सोडलं मौन!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा