Advertisement

'पद्मावती'त 'तो' सीनच नाही, भन्साळी यांनी सोडलं मौन!

संजय लीला भन्साळी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पद्मावती सिनेमावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

'पद्मावती'त 'तो' सीनच नाही, भन्साळी यांनी सोडलं मौन!
SHARES

राणी पद्मावती यांच्या जीवनावर आधारित 'पद्मावती' चित्रपटाला देशभरातून विरोध होत आहे. या वादावर निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मौन सोडलं आहे. संजय लीला भन्साळी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पद्मावती सिनेमावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शाहीद कपूर, दीपिका पादुकोण आणि रणबीर सिंहनं ट्वीटरवर देखील शेअर केला आहे.




काय म्हणाले भन्साळी?

अत्यंत प्रामाणिकपणे, कष्टानं आणि जबाबदारीनं मी हा चित्रपट बनवला आहे. राणी पद्मावतीच्या कथेनं मी प्रभावित झालो आहे. पण हा चित्रपट काही अफवांचा बळी ठरला आहे. चित्रपटात राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यात एक ड्रीम सिक्वेन्स दाखवण्यात आल्याची अफवा पसरवण्यात आली. पण हे खोटं आहे. चित्रपटात असा सीनच नाही.  


याशिवाय भन्साळी म्हणाले की, 'कोणाच्याही भावना दुखावतील असं या सिनेमात काहीच नाही. राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्या दरम्यान कोणताही सिक्वेन्स दाखवण्यात आला नाही. चित्रपट बनवताना राजपूतांच्या मान-मर्यादेचाही सन्मान राखण्यात आला आहे,'  



हेही वाचा-

रणवीर सिंह म्हणतोय 'हे जग वेडं आहे'!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा