Advertisement

रणवीर सिंह म्हणतोय 'हे जग वेडं आहे'!


रणवीर सिंह म्हणतोय 'हे जग वेडं आहे'!
SHARES

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी कलाकार माहिरा खान आणि रणबीर कपूरचे सिगारेट पितानाचे न्यूयॉर्कमधले काही फोटो वायरल झाले होते. त्यानंतर माहिरा खानवर सोशल मीडियावर बरीच टीका करण्यात आली. त्यादरम्यान रणबीर आणि माहिराने शांत राहणं पसंत केलं. पण यावर आता असलेल्या रणवीर सिंगने आपली प्रतिक्रिया दिली आहे.



फिल्मफेअर मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणवीर म्हणाला :

मी फक्त माझ्या अनुभवांबद्दल बोलू शकतो. एक अशी वेळ असते, जेव्हा मी कोणत्या तरी व्यक्तीबरोबर आहे आणि ते माझे खाजगी क्षण असतात. मला नाही वाटत ते क्षण कोणीतरी अशा पद्धतीने टिपावेत. पण असं झालं, तर त्या वेळी आपण काही नाही करू शकत. आपल्याला नेहमी स्वतःबरोबर वाईट गोष्टी ही घेऊन चालावं लागत. मला जे आवडतं, ते मी करतो. मी काम करून खूप पैसे कमवले आहेत. पण काही गोष्टी खरंच त्रास देणाऱ्या असतात. हे जग वेडं आहे.



माहिरा खानबद्दल बोलताना रणवीर म्हणाला:

प्रत्येकाची विचार करण्याचा, बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. आपण फक्त ते ऐकू शकतो. आपल्याला आयुष्य जगायला हवं आणि दुसऱ्यांनाही जगू द्यायला हवं आणि त्याबरोबरच आपल्या महत्त्वाच्या कामावर लक्षही द्यायला हवं. माहिरा खूप चांगली परफॉर्मर आणि एंटरटेनर आहे.

रणवीर आपल्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'पद्मावती' या सिनेमात सुल्तान अलाउद्दीन खिलजी या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

सोनम कपूरला झालाय गंभीर आजार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा