Advertisement

'डान्स दिवाने'च्या सेटवरील १८ जण कोरोना पॉझिटिव्ह

‘डान्स दिवाने’ या शोच्या सीझन ३ मध्ये तब्बल १८ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आली आहे.

'डान्स दिवाने'च्या सेटवरील १८ जण कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर कोरोनामुळे प्रचंड मोठा हाहाकार माजला आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, धर्मेश येलांडे हे परिक्षकाची भूमिका पार पाडत असलेल्या ‘डान्स दिवाने’ या शोच्या सीझन ३ मध्ये तब्बल १८ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आली आहे.

एका प्रसिद्ध संकेतस्थळानं दिलेल्या वृत्तानुसार, ‘डान्स दिवाने’ सीझन ३च्या सेटवरील १८ क्रू मेंबर्सचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. क्रू मेंबर कोरोना संक्रमित झाल्याची बातमी समोर आल्यानंतर, या कार्यक्रमाच्या गोरेगाव फिल्मसिटी स्थित सेटवर मोठा गोंधळ माजला आहे.

एफडब्ल्यूईसीएसचे सरचिटणीस अशोक दुबे यांनी एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं की, जे काही घडले ते दुर्दैवी आहे. आमची प्रार्थना आहे की, ज्यांना लागण झाली आहे, ते लवकर बरे व्हावेत. कोरोनाची लागण सध्या केवळ शोच्या क्रू मेंबर्सना झाल्याचं समोर येत आहे. यात अद्याप कोणताही स्पर्धक किंवा परीक्षक यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलेलं नाही .

शोची शूटिंग सुरू होण्याआधी त्यातील सहभागी कलाकार आणि सर्व क्रू मेम्बर्सची अगोदरच कोरोना चाचणी केली जाते. म्हणूनच त्यांच्याकडे आता नवीन क्रू बोलवण्यासाठी थोडा वेळ असल्याचं त्यांनी सांगितलं. ५ एप्रिल रोजी या शोचे पुढील शूट होणार असून, त्यावेळी पुन्हा एकदा सगळ्यांची प्री-टेस्ट होणार आहे. जे कोरोना-निगेटिव्ह असतील, केवळ त्यांनाच शूटिंगची परवानगी दिली जाईल. परंतु, यानंतरही सेटवर बरीच सावधगिरी बाळगली जाईल.



हेही वाचा

"रावरंभा" तून उलगडणार ऐतिहासिक प्रेमकहाणी..

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा