Advertisement

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून पुरस्काराची घोषणा झाली आहे.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
SHARES

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून पुरस्काराची घोषणा झाली आहे. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. एखाद्या क्षेत्रात बहुमुल्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

राज्य सरकारकडून १९९६ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार महाराष्ट्रचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला. तर, दुसरा पुरस्कार १९९७ मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना देण्यात आला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणाऱ्या आशाताई, मंगेशकर घराण्यातील दुसऱ्या व्यक्ती आहेत.

आशा भोसले यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील गायनासाठी त्यांना ७  वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. २००८ मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. २००८ मध्ये त्यांना पद्म विभूषण पुरस्कारानंही गौरवण्यात आलं. 

हेही वाचा -

  1. कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू

  1. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या 'पिकासो'वर राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची मोहोर!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा