Advertisement

डेजी शाह स्कोर ट्रेंड्स इंडियावर नंबर वन!


डेजी शाह स्कोर ट्रेंड्स इंडियावर नंबर वन!
SHARES

‘जय हो’ या सिनेमात सलमान खानची जोडीदार बनल्याने चर्चेचा विषय ठरलेली डेझी शाह पुन्हा सलमानसोबतच्याच ‘रेस ’ मुळे स्कोर ट्रेड्स इंडियावर नंबर वन पोझिशनवर पोहोचली आहे.

सलमानसोबत जो दिसतो त्याला त्याचा फायदा होतोच, हे पुन्हा एकदा डेझीच्या रूपात सिद्ध झालं आहे. ‘रेस ३’मध्ये सलमानची नायिका नव्हे, तर बहिणीची भूमिका साकारणाऱ्या डेझीला कोणत्या ना कोणत्या प्रकारे का होईना पण सलमानच्या साथीचा फायदा झालाच.


संवाद लोकप्रिय 

गेल्या काही दिवसांपासून ‘रेस ३’ चित्रपटामुळे डेझी कायम चर्चेत होती. ‘रेस ३’ मधला ‘अवर बिजनेस इज अवर बिजनेस... नन ऑफ युवर बिजनेस...’ हा तिचा संवादही खूप लोकप्रिय झाला. सलमानच्या डायलॉग्सपेक्षा डेजीच्या तोंडी असलेल्या या संवादाला चाहत्यांची पसंती मिळाली. याच पसंतीनं डेझीला स्कोर ट्रेंड्समध्ये पहिल्या नंबरवर पोहोचवलं.


भरपूर कव्हरेज

‘रेस ३’ आणि दबंग टूरमूळे गेल्या काही दिवसांमध्ये वृत्तपत्रांमध्ये भरपूर कव्हरेज मिळालेली डेझी शाह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लिडर बोर्डर पाचव्या क्रमांकावर पोहोचली. मे महिन्यामध्ये १६व्या स्थानी असलेली डेझी दिवसेंदिवस लोकप्रियतेची एक एक पायरी चढत आता पहिल्या पाच लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत आली आहे.


जॅकलीन दुसऱ्या स्थानी 

न्यूजमध्ये सतत राहिल्यामुळे डेझी ‘न्यूज प्रिंट’मध्ये सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. स्कोर ट्रेड्सच्या चार्टवर ७२ गुणांसह डेझी ‘न्यूज प्रिंट’मधील नंबर वन अभिनेत्री बनली आहे. तर तिची ‘रेस ३’मधली को स्टार आणि दबंग टूरमधली सहकारी जॅकलीन फर्नांडिस ५७ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

‘न्यूज प्रिंट’मध्ये लोकप्रिय

देशभरातल्या मीडियानं गेल्या महिनाभरात डेजीविषयी प्रकाशित केलेल्या न्यूज कव्हरेजमुळं ‘न्यूज प्रिंट’ मीडियामधली ती सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनली असल्याचं स्कोर ट्रेंड्सचे सहसंस्थापक अश्वनी कौल यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियामध्येही डेझीची प्रसिध्दी वेगाने होत आहे. १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून हा डेटा गोळा केला जातो. त्या आधारे बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचलं जातं.



हेही वाचा -

गायिका अनुराधा पौडवाल, कुमार सानू यांचा ब्रिटिश संसदेत सत्कार

अभिनेता कवी कुमार अाझाद उर्फ डाॅ. हाथी यांचं निधन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा