Advertisement

अभिनेता कवी कुमार अाझाद उर्फ डाॅ. हाथी यांचं निधन


अभिनेता कवी कुमार अाझाद उर्फ डाॅ. हाथी यांचं निधन
SHARES

सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय विनोदी मालिकेतील अभिनेता कवी कुमार आझाद यांचं सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेमधील डाॅ. हंसराज हाथीच्या भूमिकेतून ते घराघरात पोहोचले होते. सोमवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना मीरारोडमधील वोकहार्ट हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.


डाॅ. हाथी कौतुकास्पद विनोदी पात्र

तारक मेहता...या विनोदी मालिकेनं अाबालवृद्धांना वेड लावलं असून त्यातील कवी कुमार आझाद यांचं डाॅ. हंसराज हाथी हे पात्रही प्रेक्षकांच्या चांगल्याचं पसंतीस पडलं होतं. तारक मेहता... मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी कवी कुमार आझाद यांनी फोन करून आपली तब्येत ठिक नसल्यानं आज शूटिंगला येऊ शकणार नसल्याचं कळवलं होतं. या फोननंतर काही वेळातच आझाद केल्याची दु:खद बातमी आली आणि आपल्याला धक्काच बसल्याचंही असित कुमार मोदी यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितलं.


उत्तम अभिनेता

कवी कुमार आझाद एक उत्तम अभिनेते होतेच पण त्याचबरोबर एक उत्तम व्यक्तिमत्व होतं. तारक मेहता या मालिकेसह मालिकेच्या टीमबरोबरचं त्यांचं एक वेगळंच नातं होतं. तब्येत ठीक नसतानाही तो नियमित शूटिंगला यायचा, असंही त्यांनी सांगितलं आहे.


शस्त्रक्रियेद्वारे केलं वजन कमी

आझाद यांच्या निधनानं छोट्या पडद्यावर हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आझाद यांनी २०१० मध्ये ८० किलो इतकं वजन शस्त्रक्रिया करून कमी केल्याची माहिती समजते. मन हेलावून टाकणारी बाब म्हणजे, मृत्यूच्या एक दिवस आधी रविवारी ८ जुलैला आझाद यांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्ट टाकली होती. 'किसी ने कहा है की, कल हो ना हो, मैं कहता हू पल हो ना हो, हर लम्हा जिओ' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे आझाद यांना कुठं तरी काही तरी अघटित होणार असल्याची चाहूल तरी लागली नव्हती ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.


आझाद यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना इमर्जन्सी रूग्णवाहिकेतून हाॅस्पीटलला आणण्यात येत होतं. त्यावेळी रूग्णावाहिकेत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यासाठी तपासणी केली असता, ते आधीच मृत झाल्याचं निष्पन्न झालं. सकाळीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. शिवाय त्यांना श्वसनाचाही विकार होता.
- डाॅ. रवी हिरवानी, वोकहार्ट हाॅस्पीटल


हेही वाचा -

धक्कादायक! अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सर झुंज

मेघडंबरीतील 'सेल्फी' भोवली, रितेशला मागावी लागली माफी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा