Advertisement

छोटा भीमच्या चित्रपटाला दलेरच्या अँथम साँगचा तडका

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अॅनिमेटेड कॅरेक्टर असलेला छोटा भीम लवकरच चित्रपटाच्या रूपात आपल्या चाहत्यांच्या भेटणार आहे. ‘छोटा भीम कुंफू धमाका’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट ३ डी स्वरूपात दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचंच अँथम साँग दलेर मेहंदीनं गायलं आहे.

छोटा भीमच्या चित्रपटाला दलेरच्या अँथम साँगचा तडका
SHARES

कार्टुन आणि अॅनिमेटेड सिनेमांचं विश्व आज केवळ बच्चे कंपनींपुरतंच मर्यादित राहिलेलं नसून सर्वच वयोगटातील प्रेक्षक या चित्रपटांच्या प्रेमात असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळंच आज या चित्रपटांनाही एखाद्या मोठ्या स्टारच्या चित्रपटांसारखी ट्रीटमेंट मिळू लागली आहे. ‘छोटा भीम कुंफु धमाका’ या चित्रपटाचं अँथम साँग दलेर मेहंदीसारख्या आघाडीच्या गायकानं गाणं ही याची जणू पोचपावतीच म्हणावी लागेल.


३ डी स्वरूपात 

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अॅनिमेटेड कॅरेक्टर असलेला छोटा भीम लवकरच चित्रपटाच्या रूपात आपल्या चाहत्यांच्या भेटणार आहे. ‘छोटा भीम कुंफू धमाका’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट ३ डी स्वरूपात दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचंच अँथम साँग दलेर मेहंदीनं गायलं आहे. याबद्दल दलेर म्हणाला की, छोटा भीमसारख्या लोकप्रिय कॅरेक्टवर आधारित असलेल्या चित्रपटात हे गाणं असणं हीच या गाण्याची खासियत आहे. संगीतकार सुनील कौशिक यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. ऊर्जा आणि पंपिंग पॅक असलेलं हे गाणं छोटा भीमच्या प्रतिमेचं वैशिष्ट्य ठरणारं आहे. हे प्रमोशनल गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कारण यातून छोटा भीम आणि त्याच्या मित्रांच्या मैत्रीतली ताकद दिसून येईल.


लहान पिढीचं आकर्षण 

छोटा भीमबद्दल दलेर म्हणाला की, छोटा भीम हे आजच्या लहान पिढीचं मुख्य आकर्षण आहे. मला या चित्रपटासाठी गाणं गायला मिळालं याचा मला खूप आनंद आहे. माझी पाच वर्षांची मुलगी रुबाबसुद्धा छोटा भीमची खूप मोठी चाहती आहे. तीसुद्धा या गाण्यामध्ये आहे. तिनं या गाण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. ती या गाण्यावर चित्रित होणाऱ्या व्हिडीओमध्येही दिसणार आहे. खरं तर एखाद्या फिचर फिल्मसाठी अशाप्रकारे गाण्यावर व्डिडीओ चित्रीत करण्याचा आमचा पहिलाच प्रयोग आहे. या गाण्यातील एनर्जी लहान मुलांसहीत मोठ्यांनाही थिरकायला लावणारी असल्याची मला खात्री आहे.


म्युझिक व्हिडिओसुद्धा 

राजीव चिलाका यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दलेरकडून या चित्रपटाचं अँथम साँग करून घेण्याबाबत मे म्हणाले की, या चित्रपटातील दलेर मेहंदी यांनी गायलेल्या गाण्यावरील प्रतिक्रिया जाणण्यासाठी आम्ही सर्वजण खूपच उत्सुक आहोत. या गाण्याचं रेकॉर्डिंग संपलं असून, लवकर म्युझिक व्हिडिओसुद्धा करण्याची योजना आहे. या गाण्यासाठी दलेर यांनी जबरदस्त काम केलं आहे. त्यामुळंच हे गाणं मुलांना खूपच आवडेल असा विश्वास वाटतो.


१० मे रोजी प्रदर्शित 

‘छोटा भीम कुंफू धमाका’ या चित्रपटात भीम आणि त्याचे मित्र जगातील सर्वात मोठ्या कुंफू स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी चीनमध्ये जातात. मात्र भीमला चीनच्या राजकुमारीला दुष्ट जुहूंपासून वाचवण्यासाठी बोलावलं गेल्यामुळं कशाप्रकारे त्या स्पर्धेत अडथळे निर्माण होतात याची कथा या चित्रपटात आहे. १० मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा - 

शाहरुखने विकले २२ सिनेमांचे हक्क

अखेर ‘रमाई’च्या रूपात अवतरणार वीणा!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा