Advertisement

बीर राधा शेरपानं डान्स चॅम्पियनचा किताब पटकावला


बीर राधा शेरपानं डान्स चॅम्पियनचा किताब पटकावला
SHARES

मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर जग जिंकता येतं, असं आपण नेहमी ऐकतो. मात्र, 'डान्स प्लस ३'चा विजेता बीर राधा शेरपा यानं हे खरं करून दाखवलं आहे. 'डान्स प्लस ३' शोचा खिताब स्वत:च्या नावे केल्यानंतर बीर राधा शेरपानं पुन्हा एकदा बाजी मारली आहे. स्टार प्लसवरील 'डान्स चॅम्पियन' शोची ट्रॉफी देखील बीर राधा शेरपानं जिंकली आहे.




सिंचारमध्ये राहणाऱ्या बीर राधा शेरपानं नेहमीच आपल्या डान्सनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याचा डान्स पाहून फक्त प्रेक्षकच नाही, तर शोचे परीक्षक देखील प्रभावित झाले. 'डान्स चॅम्पियन' विजेत्याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. पण 'मुंबई लाइव्ह'ला खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शोचा विजेता बीर राधा शेरपा असणार आहे. विजेत्याची घोषणा या वीक-एण्डला फायनल एपिसोडमध्ये करण्यात येईल.



इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना बीर म्हणाला की, "मी लहान शहरातून आलो आहे. जिथे करिअर म्हणून डान्सला स्विकारलं जात नाही. मला या शोचा भाग व्हायला मिळालं. त्यामुळे मी खरंच खूप नशीबवान आहे. मला अजून डान्स शिकायचा आहे. डान्सच्या माध्यमातून मला देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचं आहे. जर तुमच्याकडे टॅलेंट आहे, तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही. तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही.”

बीर राधा शेरपानं फायनलमध्ये चार जणांना मागे टाकत विजय मिळवला आहे. बीर राधासोबत फैजल खान, सुशांत खत्री, पीयूष भगत आणि एमजे 5 हे स्पर्धक फायनलमध्ये होते.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा