Advertisement

दीपिका- कॅटरीना साथ साथ


दीपिका- कॅटरीना साथ साथ
SHARES

मुंबई - दीपिका पदुकोण आणि कॅटरीना कैफ या दोघी लवकरच एकत्र येणार आहेत. अवाक झालात ना तुम्ही हे ऐकून? पण हे खरे आहे. एकेकाळी अभिनेता रणबीर कपूर याच्यामुळे दोघांच्यात कॅट फाइट सुरू होती. पण आता या दोघी एकाच चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. या दोघांसोबत किंग खान शाहरुख रोमान्स करताना दिसेल. बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल राॅय यांनी शाहरुखला साइन केले आहे. या चित्रपटात सुरुवातीला सोनम कपूर आणि आलिया भट यांच्या नावाची चर्चा होती. पण आता दीपिका आणि कॅटरीना यांची या चित्रपटात वर्णी लागल्याचे समोर आले आहे.

दीपिका पदुकोण आणि कॅटरीना कैफ या एकेकाळच्या कट्टर विरोधक होत्या आणि याला कारणीभूत होता अभिनेता रणबीर कपूर. कधीकाळी दोघीही रणबीर कपूरच्या गर्लफ्रेंड होत्या. आता त्या रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड आहेत. त्यामुळे दोघांना एकत्र काम करायला जास्त आवडत नसल्याचेही बोलले जात होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement