Advertisement

...आणि दीपिका पदुकोण पुन्हा संतापली!


...आणि दीपिका पदुकोण पुन्हा संतापली!
SHARES

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' सिनेमाच्या अडचणी संपता संपत नाहीयेत. सुरवातीपासूनच या सिनेमाच्या बाबतीत काही ना काही वाद होतच आहे. आता पुन्हा एकदा या सिनेमावरून वाद झाला आहे. काही दिवसांपूर्वी सूरत येथील एका शॉपिंग मॉलमध्ये ‘पद्मावती’च्या पोस्टरची शानदार रांगोळी साकारण्यात आली होती. पण काही वेळातच काही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या रांगोळीची नासधूस केली.



ही घटना दीपिका पदुकोणला समजताच तिला प्रचंड राग आला आणि तिने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईराणी यांना टॅग करत, सोशल मीडियावर या घटनेविरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच, ‘हे असले प्रकार कुठेतरी थांबायला हवेत आणि कायदा हातात घेणा-यांविरोधात तातडीने कारवाई व्हायला हवी,’ अशी मागणी तिने केली होती. दीपिकाच्या या मागणीची गंभीर दखल घेत, पोलिसांनी गुरुवारी ही रांगोळी नष्ट करणा-या हिंदू युवा वाहिनीच्या १३ सदस्यांना अटक केली. या सर्वांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



सूरतच्या मॉलमध्ये करण जरीवाल नामक कलाकाराने ‘पद्मावती’च्या पोस्टरची रांगोळी साकारली होती. ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल ४८ तास लागले होते. कलाकाराने ४८ तास एकाच जागेवर बसून ही रांगोळी काढली होती. पण हिंदूयुवा सदस्यांनी काही सेकंदात या रांगोळीची नासधूस केली.

दीपिकाने हे ट्विट करताच तिच्या चाहत्यांनी ट्विटरवर या घटनेचा निषेध करत आपला संताप व्यक्त केला.





एकीकडे हा सर्व प्रकार सुरु असताना भन्साली प्रोडक्शनने पुन्हा एकदा पद्मावती सिनेमामध्ये कोणतीही आक्षेपार्ह बाब नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच, राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यात कोणतंही आक्षेपार्ह दृश्य चित्रित केलं नसल्याचं ट्विट करुन भन्साली प्रोडक्शनने जाहीर केलं आहे.




हेही वाचा

'पद्मावती'तील रणवीर सिंहच्या 'अलाउद्दीन खिलजी'चा लूक आऊट

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा