Advertisement

'पद्मावती' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर?


'पद्मावती' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर?
SHARES

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटाच्या समस्या काही कमी होण्याचं नावच घेत नाहीत. करणी सेना आणि इतर राजकीय संघटना 'पद्मावती' चित्रपटाचा विरोध करायला एकत्र आले आहेत. आता 'पद्मावती' चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी आणखी एक समस्या निर्माण झाली आहे.  

'पद्मावती' चित्रपटाचे सर्व कागदपत्र सेंसर बोर्डाकडे जमा करण्यात आले नाहीत. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या १५ दिवस आधी सर्व कागदपत्र सेंसर बोर्डाकडे जमा करणं आवश्यक आहे. पण 'पद्मावती' प्रदर्शित होण्यासाठी केवळ १३ दिवस आहेत. 'पद्मावती' चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कागदपत्र जमा न केल्यानं प्रदर्शनाची तारीख पुढे जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच १२ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.  

चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यासाठी सध्या कागदपत्र कारणीभूत असल्याचं दाखवण्यात येत आहे. पण मीडिया रिपोर्टनुसार, करणी सेना आणि राजकीय पक्षांच्या विरोधानंतर चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

करणी सेनेचा आरोप आहे की, संजय लीला भन्साळी यांनी पद्मावतीच्या ऐतिहासिक तथ्यांशी मोडतोड केली आहे. राणी पद्मावतीची कथा चुकिच्या पद्धतीनं जगासमोर मांडली आहे. त्यामुळे राजपुत समाज, करणी सेना आणि राजकीय पक्षाकडून विरोध करण्यात येत आहे.



हेही वाचा

'पद्मावती' प्रदर्शित होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही - दीपिका पादुकोण


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा