ऊलाला... दीपिकाचे 'समर' फोटोशूट!

Mumbai
ऊलाला... दीपिकाचे 'समर' फोटोशूट!
ऊलाला... दीपिकाचे 'समर' फोटोशूट!
ऊलाला... दीपिकाचे 'समर' फोटोशूट!
ऊलाला... दीपिकाचे 'समर' फोटोशूट!
ऊलाला... दीपिकाचे 'समर' फोटोशूट!
See all
मुंबई  -  

सुंदर आणि अप्रतिम हेच शब्द तुमच्या तोंडी येतील जेव्हा तुम्ही दीपीकाचा हा नवा अंदाज बघाल. दीपिका पदुकोणने नुकतेच एका ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये तिचा अंदाज घायाळ करणारा आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवर तिने हे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोशूटचे वैशिष्ट्य म्हणजे फोटोशूटसाठी समर कलर्सचा वापर करण्यात आला आहे. फोटोसाठी वापरण्यात आलेले बॅकग्राऊंडही उठून दिसत होते. बॅग्राऊंडमध्ये वापरण्यात आलेल्या फुलांमुळे त्यात एक ताजेपणा जाणवतोय. 

या फोटोंमध्ये दीपिकाचे हावभाव आणि अदा मन मोहून टाकणारी आहे.

काही दिवसांपूर्वीच तिने तिचा नवीन ब्रॅण्ड लाँच केला. 'ऑल अबाऊट यू' असे तिच्या नव्या ब्रॅण्डचे नाव आहे.

हॉलिवूड यशानंतर दीपिका पदुकोण पुन्हा बॉलिवूड चित्रपटसृष्टीत परतली आहे. पद्मावती चित्रपटामुळे दीपिका सध्या चर्चेत आहे. पद्मावतीमध्ये रणवीर सिंग आणि शाहीद कपूर यांच्याही भूमिका आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.