दिवाळी अशी आणि तशीही...

 Pali Hill
दिवाळी अशी आणि तशीही...
दिवाळी अशी आणि तशीही...
दिवाळी अशी आणि तशीही...
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - एकीकडे बॉलिवूडमध्ये सर्व जण दिवाळी साजरी करत होते, तर दुसरीकडे काही स्टार आपलं करियर सावरण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत होते. उदाहरणार्थ कॅटरिना, कंगना आणि अंकिता लोखंडे... आता तुम्ही विचार करत असाल की, म्हणजे नेमकं काय...

तर कॅटरिनासाठी 2016 हे वर्ष जास्त लकी ठरलं नाही. तिचे दोन्ही चित्रपट ,फितूर आणि बार-बार देखो बॉक्स ऑफिसवर फार चालले नाहीत. तर दुसरीकडे ती आणि रणबीर कपूर वेगळे झाले... आता आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी तिनं बेडरूममध्ये गुलाबी स्फटिक ठेवलेत. तसंच ती सोबत जांभळ्या रंगाचं स्फटिकही ठेवू लागलीये.

कंगना रनौतनंही आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टी टळण्यासाठी आपल्यासोबत इव्हिल आय पेंडंट ठेवायला सुरुवात केलीये.

पवित्रा रिश्ता या सिरिअलमधून घरोघर पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेनं धार्मिक मार्गावर वाटचाल सुरू केलीये. तिनं घरात दिवाळीच्या दिवशी पूजा केली. तसंच आधीचा नवरा सुशांत सिंह राजपूत याला धोनी चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छाही दिल्या.

Loading Comments