Advertisement

बिग बाॅस : पुष्कर, भूषण, मेघा होणार भावूक !


बिग बाॅस : पुष्कर, भूषण, मेघा होणार भावूक !
SHARES

कलर्स मराठीवर सुरू असलेल्या ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये मंगळवारी बिग बॉस यांनी सदस्यांवर फ्रीझ-रीलीझ हे साप्ताहिक कार्य सोपवलं. या कार्याअंतर्गत बिग बॉसच्या घरातील सदस्यांना म्हणजेच सई, रेशम, स्मिता आणि आऊ यांना बिग बॉसतर्फे सुंदर सरप्राईझ मिळालं. रेशमची मुलगी मंगळवारी बिग बॉसच्या घरामध्ये आली आणि तिनं सगळ्यांना आपलंसं केलं. तसंच स्मिताच्या आईनंही स्मिताला सल्ले देत आणि मार्गदर्शन करत तिचं मनोबल वाढवलं. बुधवारी बिग बॉसच्या घरामध्ये भूषण, मेघा आणि पुष्करच्या घरातील सदस्य  येणार आहेत. पुष्करला बिग सरप्राईस

बुधवारी बिग बॉसच्या घरामध्ये भूषणचा मुलगा त्याची भेट घेण्यासाठी येणार आहे. तसंच मेघाची आई आणि मुलगी साक्षीही येणार आहेत. सगळ्यात मोठं सरप्राईझ पुष्करला मिळणार आहे. कारण त्याच्या बायकोसोबतच त्याची चिमुकली मुलगीही या घरामध्ये पुष्करला भेटणार अाहेत.  तिला बघून सगळेच खूप खुश होणार आहेत. मंगळवारचा अाणि बुधवारचा दिवस  बिग बॉसच्या घरातील सदस्यांना खूपच भावूक करणारा अाहे.हेही वाचा -

‘बिग बॅास’चं घर, चाहत्यांच्या दारी !

सागर देशमुख साकारणार पुलं


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा