Advertisement

'KGF Chapter 2' चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी

ट्विटरवर यशच्या फॅन ग्रुपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

'KGF Chapter 2' चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी
SHARES

केजीएफ २ अध्याय २ च्या रिलीजची तारीख अखेर जाहीर केली गेली. चाहते २ वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. केजीएफच्या चाहत्यांनी रिलीजच्या दिवशी नॅशनल हॉलिडेची मागणी लावून धरली आहे.

केजीएफ फ्रेंचायझीचा दुसरा भाग १६ जुलै २०२१ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात यश आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. सुपरस्टार यशच्या वाढदिवशी रिलीज झालेल्या ट्रेलरनं २४ तासात १०० दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा गाठला.

डीएनएच्या वृत्तानुसार, ट्विटरवर यशच्या फॅन ग्रुपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जाहीर तारखेची घोषणा करून ही राष्ट्रीय सुट्टी घोषित करण्याची मागणी केली आहे. ज्यामध्ये 'केजीएफ चॅप्टर २' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी अशी विनंती करण्यात आली आहे.

हे पत्र सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये हे लिहिलं गेलं आहे की, कारण आपल्या सर्वांना हे माहित आहे की यशचा 'केजीएफ अध्याय २' १६ जुलै २०२१ शुक्रवारी रिलीज होत आहे. लोक चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. म्हणून आम्ही आपणास विनंती करीत आहोत की राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी. आमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा फक्त एक चित्रपट नाही तर आमची भावना आहे.

'केजीएफ 2' विजय किर्गंदूर निर्मित आणि प्रशांत नील दिग्दर्शित, एक्सेल एंटरटेनमेंट, हॅमबेल फिल्म्स आणि एए फिल्म्स प्रस्तुत चित्रपट आहे. १६ जुलै २०२१ रोजी केजीएफ २ पडद्यावर प्रदर्शित होईल.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा