फातिमा सना शेख पुन्हा चर्चेत..इंस्टाग्रामवर टाकला 'शेमलेस सेल्फी'!

३ दिवसांपूर्वी फातिमा सना शेखने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यात तिने साडी नेसून पोज दिली आहे आणि सेल्फी काढला आहे. त्या फोटोला तिने 'शेमलेस सेल्फी' अशी कॅप्शन दिली. तिच्या या फोटोमुळे सध्या ती चर्चेचा विषय बनली आहे.

SHARE

'दंगल' फेम फातिमा सना शेख पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर तिला पुन्हा एकदा ट्रोल केलं जातंय. त्याचं झालं असं, की ३ दिवसांपूर्वी फातिमाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यात तिने साडी नेसून पोज दिली आहे आणि सेल्फी काढला आहे. त्या फोटोला तिने 'शेमलेस सेल्फी' अशी कॅप्शन दिली. तिच्या या फोटोमुळे सध्या ती चर्चेचा विषय बनली आहे.Shameless selfie???????? credit for Saree @swatimukund ????????

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on


या ‘शेमलेस’ प्रकरणावरून यूजर्सनी तिला ट्रोल करणं सुरु केलं. लोकांनी तिला अतिशय आक्षेपार्ह भाषेत कमेंट्स दिल्या आहेत. ‘फातिमा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,’ ‘तुला साडी नेसता येत नसेल, तर नेसू नकोस. पण या पोशाखाचा आणि मर्यादेचा असा अपमान करू नकोस,’ अशा प्रकारच्या कंमेंट्स तिला येऊ लागल्या आहेत. पण अजूनही फातिमा या प्रकरणावर काहीही बोललेली नाही.???? #tarunvishwa ????

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on


फातिमाची सोशल साइटवर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तिने रमझानच्या महिन्यात स्वत:चा एक बिकिनी फोटो शेअर केला होता. यावरूनही मोठा वाद उठला होता. या फोटोवरून अनेक युजर्सनी फातिमाला फैलावर घेतले होते.हेही वाचा

...म्हणून ते किशोर कुमार होते!


संबंधित विषय