Advertisement

चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड


चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड
SHARES

चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची भारतीय फिल्म और टेलिविजन संस्था (FTII)च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. मंगळवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालायाकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कपूर यांची या पदांवर नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. कपूर यांचा कार्यकाळ मार्च, 2023 पर्यंत असेल.

६ डिसेंबर १९४५ ला पाकिस्तानच्या लाहौरमध्ये जन्म झालेल्या शेखर कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडीया' आणि 'मासूम'सारख्या हीट चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. तसंच, ‘एलिजाबेथ’ (1998), ‘बँडिट क्वीन’ (१९९४) आणि ‘द फोर फीदर्स’ (२००२) सारख्या चित्रपटातून त्यांनी जगभर ओळख मिळवली. 'एलिजाबेथ' चित्रपटासाठी त्यांना ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळाले होते.हेही वाचा

दिपिकासह श्रद्धा, सारा, रकुल प्रितला कोरोना चाचणी करण्याचे आदेश

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या पुरस्कारानं सोनू सूद सन्मानित

Read this story in हिंदी
संबंधित विषय