Advertisement

बाळगोपाळांनी लुटला सिनेमांचा आनंद


बाळगोपाळांनी लुटला सिनेमांचा आनंद
SHARES

विलेपार्ले - वाईड अँगल फिल्म सोसायटी आणि विलेपार्ले कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनाचं औचित्य साधत 'चित्र मित्र' चित्रपट महोत्सव 2016 चे आयोजन करण्यात आलं होतं. सोमवार-मंगळवार असं दोन दिवस या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. लहानमुलांना चित्रपटांच्या आस्वाद घेता यावा म्हणून साठ्ये कॉलेजमध्ये हा महोत्सव पार पडला. या महोत्सवात 8 शो करण्यात आले ज्यात 1400 बाळगोपाळांनी भाग घेतला. या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होत. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार पराग अळवणी आणि नगरसेविका ज्योती अळवणी यांनी केलं. यावेळी संस्थेचे विश्वस्त धनंजय कुलकर्णी, विवेक रानडे, श्रीकांत भटकर, कौंतेय प्रतिष्ठानचे कौंतेय देशपांडेही उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement